महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – बीड – महा एनजीओ फेडरेशन द्वारे रोजगार हमी ते ग्राम विकास राज्यस्तरीय कार्यशाळाअयोजीत करण्यात आली होतीमहा एनजीओ फेडरेशन द्वारे राज्यातील *पाचशे गावाची निवड रोजगार हमी ते ग्राम विकास या प्रकल्पासाठी करण्यात आली आहे.*त्या गावांचा समन्वय करणाऱ्या सामाजिक संस्था, कार्यकर्ते, ग्राम विकास अधिकारी, ग्राम रोजगार सेवक व सरपंच यांच्यासाठी गुरुपौर्णिमा निमित्त एका विशेष ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
रोजगार हमी ते ग्राम विकास या प्रकल्पात *एक लाख कामगारांना 1 जानेवारी 2021 पर्यंत रोजगार देण्याचा संकल्प या उपक्रमात करण्यात आला आहे.*
रोजगार हमी मध्ये येणाऱ्या अडचणी दूर करून ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगार निर्मिती कशी होऊ शकते अथवा ग्रामविकासासाठी कसे काम केले पाहिजे,१५ ऑगस्ट रोजी ग्राम विकास आराखडा दाखल करण्यासाठी काय पूर्व तयारी केली पाहिजे याविषयी *आदर्श ग्राम समितीचे अध्यक्ष श्री पोपटराव पवार, पुण्याचे माजी विभागीय आयुक्त श्री चंद्रकांत दळवी, पाणी फाऊंडेशनचे डॉक्टर अविनाश पोळ, प्रगती फाउंडेशनच्या सौ अश्विनी कुलकर्णी, संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, श्री वसंत रावणगावकर, नवापुर चे गटविकास अधिकारी श्री नंदकुमार वाळेकर, जळगावचे कृषी उपसंचालक श्री अनिल भोकरे , ग्रामीण भागातील यशस्वी सरपंच इतर मान्यवरांनी यात मार्गदर्शन केले.*
*महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री श्री धनंजय मुंडे* यांनी या कार्यशाळेमध्ये विशेष अतिथी म्हणून राज्य सरकारची भूमिका व रोजगार हमी ते ग्रामविकास याविषयी मार्गदर्शन केले.राज्य सरकारच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांना रोजगार हमी किंवा ग्रामविकासाच्या विविध विभागांमध्ये समन्वय करता यावा *यासाठी राज्य सरकारचा GR तयार व्हावा म्हणून आपण स्वतः प्रयत्न करू* व राज्यातील ग्राम सेवक रोजगार सेवक यांना *महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन उपलब्ध करून देऊ* यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे त्यांनी सांगितले.महाराष्ट्रातील तीनशेपेक्षा अधिक गावातील प्रतिनिधींनी या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला होता.महा एनजीओ फेडरेशन संचलीत रोजगार हमी ते ग्राम विकास या *प्रकल्पात सहभागी होण्यासाठी*
9975413534
7447487480
7588954580
या क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती संयोजक समिती द्वारे करण्यात आली आहे.