महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पी.के.महाजन – पिंपरी चिंचवड – ज्ञानज्योती सावित्रीमाई फुलेंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव ,जिल्हा: सातारा ,महाराष्ट्र येथे झाला.अनेक डे (दिवस) आपण लक्षात ठेवतो परंतु ज्या दिवसा पासून आपल्या जीवनाला खरी सुरुवात झाली तो दिवस आपल्या लक्षात ही राहत नाही कारण काय तर आपण आता शिकले सवरलेले सुशिक्षित झालो आहोत.
त्यात मी पण आहे……… ज्या दिवशी आपल्याला अ ब क ड समाजायला सुरूवात झाली त्याचे रुपांतर पुढे खर आणि खोटं ह्याच्यातला फरक कळायला लागला , स्वाभिमान काय असतो हे कळायला लागल त्या दिवसाची सुरूवात म्हणजे ” 3 जुलै 1851″ रोजी पासून झाली कारण 168 वर्षा पुर्वी 3 जुलै 1851 ह्या दिवशी क्रांती सुर्य महात्मा जोतिराव फुले व क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांनी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहीली शाळा सुरु केली. हे महान कार्य करणारया थोर महामानवांना मानाचा मुजरा म्हणजे आपणही आपल्या पुढील पिढीला शिक्षण देत राहील पाहीजे….
त्याचे कारण म्हणजे घरात महिला शिकली संपुर्ण कुटुंब शिक्षीत होतय. चुल आणि मुलं हयाच्या पलीकडे महिलेला कसला ही अधिकार नव्हता. घराच्या उंबरठ्याच्या आतच महिलांचे जिवण होत. शिक्षणाचा अधिकार तर नव्हताच परंतु घरा बाहेर ही महिलांना पडू दिलं जात नव्हत. घरात आणि घरा बाहेर ही अन्याय अत्याचार च महीलांच्या नशीबी होता.बुरसटलेल्या रूढी परंपरा च्या नावाखाली महीलांवर सतत अन्याय अत्याचार होत असे. सवर्ण जातीच्या महीलांना सुद्धा शिक्षणाचे अधीकार नव्हते. अशा परिस्थितीत त्या काळाच्या पांढरपेशा वर्गाचा विरोध स्विकारून 168 वर्षा पुर्वी 3 जुलै 1851 ह्या दिवशी क्रांती सुर्य महात्मा जोतिराव फुले व क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांनी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहीली शाळा सुरु केली आणि सावित्रीबाई फुले पहील्या महीला शिक्षिका म्हणून कार्य करू लागल्या. शिक्षणाचे कार्य करत असताना त्यांना खूप त्रास सहन करावा लागला हे आपणास सर्वांना ज्ञात आहेच.
महीला शिक्षणामुळे सुशिक्षित झाल्या व सर्वच थरात पुरूषांच्या बरोबरीने काम करू लागल्या आहेत. शिक्षणामुळे महीलांना आपले हक्क, अधिकार,कर्तबगारी व जबाबदारी समजायला लागली.ज्या मुळे महीलांवरील अन्याय अत्याचाराचे प्रमाण कमी झाले. महीला चंद्रावर जावून पोहोचली. देशाचे पंतप्रधान व राष्ट्रपती सारख्या सर्वोच्च पदावर महीलांनी आपले कर्तव्य व जबाबदारया लिलया पार पाडल्या.आणी हे सर्व काही ज्या कर्तृत्ववान महीले मुळे शक्य झाले त्या महिलेचा जन्म दिवस म्हणजे 3 जानेवारी हा दिन “महीला शिक्षिका दिन” म्हणून जाहीर करावा हि निर्णय आम्हा महाराष्ट्र वासीयांसाठीच नाही तर संपुर्ण देशासाठी अभीमानास्पद आहे. कारण ह्या ज्ञानाच्या ज्योती चा प्रकाश सर्वीकडे च पोहोचलेला आहे. राजस्थान सरकार च्या हया निर्णयाने ज्ञानज्योती सावित्रीबाई घरा घरात पोहोचतील व त्यातून घरा घरात ज्ञानाची ज्योत पेटल्या शिवाय राहणार नाही. ” राजस्थान सरकार चे मानावे तितके आभार कमीच पडतील “……….या निमित्ताने महाराष्ट्र सरकारला ही सुबुद्धी सुचावी आणि महाराष्ट्र सरकारने हि असाच निर्णय घ्यावा हिच अपेक्षा!!!!.