महाराष्ट्र २४ | ऑनलाईन |पिंपरी | विशेष प्रतिनिधी|विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी दिनांक ७ जुलै रोजी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. तसेच घरातील कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे. या घटनेचा निषेध सध्या राज्यभर सुरू आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही याचा तीव्र निषेध केला आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या घटनेचा निषेध नोंदवित असताना कुठलाही अनुचीत प्रकार घडू देऊ नका, निरर्थक गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे. पोलिसही लवकरच या आरोपींना अटक करतील त्यांच्यावर योग्य कारवाई करतील पिंपरीच्या नागरिकांनी शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचीत प्रकार करु नये. शासकीय तसेच खासगी मालमत्तांचे नुकसान करू नये, असे जाहीर आवाहन पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केले आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी या ठिकाणी भेटीला येतात. अत्यंत महत्त्वाचं असं हे स्थान आहे ज्या ठिकाणी आज तोडफोड करण्यात आली. पोलिसांना आंबेडकर कुटुंबीयांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दिले आहे. आरोपींचा शोध तातडीने घ्यावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
*आमदार अण्णा बनसोडे यांनी नोंदवला निषेध*
राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो आणि गृहमंत्र्यांना विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. तसेच आरोपींंना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. अशी मागणी अण्णा बनसोडे यांनी केली आहे.