Maharashtra Rain Live Update : राज्यात पावसाचे धूमाकूळ , ‘या’ जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुलै ।। गेले काही दिवस राज्यात विविध जिल्‍ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे पुरजन्यस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Maharashtra Rain Live Update) प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

साताऱ्यात उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर
सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व शाळा महाविद्यालये व औदयोगिक प्रशिक्षण संस्था मधील विद्यार्थ्यांना उद्या (दि.२६) सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.

पुण्‍यात विजेच्‍या धक्‍क्‍याने तिघांचा मृत्यू
पुण्यात जोरदार पाऊस सुरु असून जिल्ह्याला हवामान खात्याने आज रेड अलर्ट जाहीर केला आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी पाणीच-पाणी झाले आहे. आज (दि.२५) पहाटे तीन वाजताच्या सुमारास भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिज खाली पाणी पातळी वाढली. पाणी पातळी वाढल्याने तेथील अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी तिघेजण गेले. सुरक्षित ठिकाणी हलवताना अचानक विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू झाला. या तिघांपैकी अभिषेक अजय घाणेकर (वय वर्ष २५) आणि आकाश विनायक माने (वय वर्ष २१) दोघे पुलाच्या वाडी डेक्कन येथिल रहिवासी असुन शिवा जिदबहादुर परिहार (वय १८) नेपाळी कामगार आहे. शॉक लागल्यानंतर तिघांना नजीकच्या हॉस्पिटल येथे दाखल केले. उपचारांती डॉक्टरांनी मयत घोषित केले.

‘या’ जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट
मुंबईसह (Mumbai Rain) पालघर, ठाणे, रायगड, पुणे (Pune Rain Updates) सातारा जिल्ह्याला आज (दि.२५ जुलै) अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्याला उद्याही २६ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूरला (kolhapur flood update today) उद्या २६ जुलै रोजी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुण्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Heavy rain alert in Maharashtra)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *