Maharashtra New Governor: रमेश बैस यांची उचलबांगडी ; सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुलै ।। सी.पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरकीडे माजी विधानसभा अक्ष्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने ही माहिती दिली आहे. राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील. बैस हे १८ फेब्रुवारी २०२३ पासून राज्यपाल होते. मध्यरात्रीनंतर १ वाजता राष्ट्रपती भवनाकडून यासंगदर्भातील पत्रक जारी करण्यात आलं आहे. या परित्रकामध्ये एकूण १० राज्यांमधील राज्यपालांच्या बदल्या तसेच फेरनियुक्त्या असल्याचं सांगण्यात येत आहे. सदर नियुक्त्या या पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होतील, असं सांगण्यात आलं आहे.


सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत?
६७ वर्षीय सी.पी. राधाकृष्णन हे मूळ तामिळनाडूचे आहेत. त्यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तिरुपूरमधये झाला. वयाच्या १६व्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरु केले. कोइमतूर मतदारसंघातून लोकसभेवर राधाकृष्णन रे दोन वेळा निवडून गेले. भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २०४४ ते २००७ या कालावधीत त्यांच्याकडे तामिळनाडूची सूत्रे होती. सी.पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा राज्यात या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. राधाकृष्णन हे दीर्घकाळ भाजपचे सदस्य होते. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले. ते तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.

राधाकृष्णन यांनी ११९८ आणि १९९९च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. २०१४ आणि २०१९च्या निवडणुकीतही भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती, तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी ते झारखंडचे राज्यपाल झाले.

नवीन नियुक्त्यांची यादी
सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लक्ष्मणप्रसाद आचार्य यांच्याकडे मणिपूरचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे.
गुलाबचंद कटारिया यांची पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. कटारिया यांची जागा आचार्य यांनी घेतली आहे.
कटारिया यांची केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.
हरिभाऊ किसनराव बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.
जिष्णू देव वर्मा हे तेलंगणाचे राज्यपाल असतील.
ओम प्रकाश माथूर हे सिक्कीमचे नवे राज्यपाल असतील.
रामेन डेका यांची छत्तीसगडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.
सीएच विजयशंकर यांची मेघालयच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.
कैलाशनाथन यांची पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या सर्व नियुक्त्या पदभार स्वीकारल्यापासून लागू होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *