महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी -संजीवकुमार गायकवाड – हिंगोली – ता. ११ :हिंगोली जिल्ह्यातील पीक कर्ज वाटप तसेच बी बियाणे उगवण बाबतच्या तक्रारी आणि रोजगार हमी योजनेच्या आढावा संदर्भात दिनांक दहा जुलै शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.
बैठकीमध्ये खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्ज मिळावे यासाठी अग्रणी बॅंकेच्या जिल्हा व्यवस्थापकांनी योग्य नियोजन करून कोणत्याही परिस्थितीत तात्काळ पिक कर्ज वितरणांचे नियोजन करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
बॅंकांनी शेतकऱ्यांना उद्दिष्टाप्रमाणे पिक कर्ज वितरीत केले आहे का ? किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, किती शेतकरी अजून कर्जमाफी पासून वंचित आहेत याची माहिती घेऊन पिक कर्ज वाटपाबाबत सूचना देण्यात आल्या.जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.