महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जुलै ।। आर्थिक वर्ष 2023-24 साठी तुमचे आयकर रिटर्न (ITR) (प्राप्तिकर विवरणपत्र) सबमिट करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2024 आहे. या तारखेनंतर तुमचा ITR भरल्यास दंड भरावा लागेल. विशेष म्हणजे आकारला जाणारा दंड हा तुमच्या उत्पन्नाच्या पातळीनुसार ठरत असतो.मात्र असे काही करदाते आहेत, जे अंतिम मुदतीनंतरही आयटीआर दाखल करू शकतात.
दरम्यान प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत करण्यामागे एक कारण आहे. ज्या करदात्यांचा काही व्यवसाय आहे, त्याच्या खात्यांचे ऑडिट झाले नसेल, तर त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून ही मुदत वाढवण्यात आली होती. आयकर विभाग या व्यक्तींना त्यांचे आयटीआर दाखल करण्यापूर्वी मान्यताप्राप्त चार्टर्ड अकाउंटंटकडे त्यांचे ऑडिट पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा अतिरिक्त कालावधी देत असते. दरम्यान काही करदाते आहेत जे अंतिम मुदतीनंतरही त्याचे प्राप्तिकर विवरण पत्र म्हणजेच आयटीआर भरू शकतात.
कोणत्या करदात्यांना मुदतीनंतर भरता येणार ITR
आंतरराष्ट्रीय व्यवहार करत असलेले व्यावसायिक – यांना त्यांच्या खात्याची माहिती देण्यासाठी सखोल लेखाजोखा आणि संपूर्ण कागदपत्रांची आवश्यकता असते. हे सामावून घेण्यासाठी त्यांना त्यांचे ITR दाखल करण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदतवाढ देण्यात आलीय.
देशांतर्गत व्यवहारांमध्ये गुंतलेल्या व्यवसायिकांना देखील तपशीलवार अहवाल आणि अनुपालन प्रक्रियेची आवश्यकता असते. त्यामुळे हे करदाते देखील मुदतीनंतर आपला आयटीआर भरू शकतात. दरम्यान मुदतीनंतर प्राप्तिकर विवरण भरण्यासाठी पात्र होण्याची प्रक्रिया थोडी जटिल असते. कारण ते आयकर कायद्याच्या विशिष्ट कलमांवर अवलंबून असते. काही प्रकरणांमध्ये मुदतीनंतर आयटीआर भरल्यास शुल्क लागते. दरम्यान ज्या लोकांचे उत्पन्न 5,00,000. आहे त्यांना 5,000 रुपयांचा दंड आकारला जातो.
३१ जुलैपूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न भरता आला नाही तर?
अंतिम मुदत चुकवल्यास प्राप्तिकर कायद्याच्या कलम 234F अंतर्गत उशीरा रिटर्न भरण्यासाठी 5,000 चे शुल्क द्यावे लागतील. तर ज्यांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी ते 1,000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. दंडाच्या पलीकडे थकित कराच्या रकमेवर 1% मासिक व्याज आकारले जाते, ज्यामुळे आर्थिक भार वाढतो.