Yashashri Shinde Case : पोलीसी खाक्या दाखवताच आरोपी दाऊद पोपटासारखा बोलला ; यशश्री शिंदेच्या हत्येचं खरं कारण समोर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ जुलै ।। नवी मुंबईच्या उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणात (Yashashri Shinde Case) मोठी अपडेट समोर आली आहे. यशश्रीच्या हत्येप्रकरणी उरण पोलिसांनी आरोपी दाऊद शेखला मंगळवारी अटक केली. अटकेनंतर आरोपीला उरणमध्ये आणण्यात आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पण त्याने यशश्रीची निर्घृणपणे हत्या करण्यामागचे कारण नव्हते सांगितले. आता या हत्येमागचे कारण आरोपीने सांगितले आहे. लग्नाला नकार दिला म्हणून यशश्रीची हत्या केली असल्याचे त्याने कबूल केले आहे. यशश्रीला शिवीगाळ केल्याप्रकरणी दाऊद शेखविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यशश्री शिंदेची हत्या करणारा दाऊद शेखला अटकेनंतर आज कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. आरोपीला पोलिसांनी कर्नाटकच्या गुलबर्गा येथून अटक केली होती. पहाटे पाच वाजताच्या सुमारास पोलिसांनी त्याला अटक केली होती. अटकेनंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला पण त्याला कोणताही पश्चाताप नव्हता. लग्नाला नकार दिल्यामुळे हत्या केली असल्याची दाऊद शेखने पोलिसांना सांगितले. आता आज त्याला मोठ्या पोलिस बंदोबस्तात कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. यावेळी आणखी तपासासाठी पुणे पोलिस कोर्टाकडे आरोपीला पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करणार आहे.

यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार आहे. ज्येष्ठ वकील उज्वल निकम हे प्रकरण हाताळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांसोबत चर्चा केल्यानंतर ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घ्यावे असे आयुक्तांना आम्ही सांगितले. उज्वल निकमांची आम्ही नियुक्ती केली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल.’

दरम्यान, यशश्री शिंदे आणि दाऊद शेख एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यामध्ये ३ ते ४ वर्षांपासून मैत्री होती. यशश्री उरणमध्ये ज्याठिकाणी राहत होती तिथेच दाऊद देखील राहायला होता. पण २०१९ मध्ये यशश्रीच्या कुटुंबीयांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यावेळी त्याच्याविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तेव्हा दाऊद जेलमध्येही गेला होता. त्यानंतर तो कर्नाटकला गेला होता. दाऊद उरणमध्ये आल्यानंतर त्याने यशश्रीशी फोनद्वारे संपर्क केला. त्यावेळी दोघांचं भेटायचे देखील ठरलं होतं. या भेटीवेळी यशश्रीने लग्नाला नकार दिला त्यामुळे संतप्त झालेल्या दाऊदने तिची हत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *