चला तर मग भेट देऊ या सत्यम ज्वेलर्स च्या महा-मंगळसूत्र उत्सवाला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑगस्ट ।। भारतीय संस्कृतीत मंगळसूत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी मंगळसूत्र हा केवळ अलंकार नसून तिच्या वैवाहिक जीवनाचे पवित्र प्रतीक आहे. हा दागिना तिच्या व्यक्तिमत्त्वाला अभिमान आणि आकर्षण प्रदान करतो. मंगळसूत्राचा इतिहास भारतीय संस्कृतीच्या प्राचीन काळापासून आहे. हे केवळ सोन्याचे किंवा डायमंडचे अलंकार नसून त्यामध्ये भारतीय स्त्रीची संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा गुंतलेली आहे. विवाहाच्या निमित्ताने वधूला वराच्या हस्ते मंगळसूत्र बांधले जाते, आणि सात-जन्माचे प्रेमाचे वचन देऊन तिला आपलेसे केले जाते.

मंगळसूत्र हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे . मंगल म्हणजे शुभ आणि सूत्र म्हणजे दोरा. मंगळसूत्र केवळ स्त्रीच्या गळ्यातील एक शोभेवंत अलंकार नसून वैवाहिक आयुष्याच्या सुखसमृद्धीचे प्रतीक आहे.भारतात मंगळसूत्राचे विविध प्रकार आहेत. महाराष्ट्रात काळ्या मण्यांच्या मंगळसूत्राला विशेष महत्त्व आहे. हे
मंगळसूत्र महाराष्ट्रीय पारंपारिक पेहरावात विशेष शोभा आणते. दक्षिण भारतात पिवळ्या धाग्याच्या मंगळसूत्राला अधिक प्राधान्य दिले जाते. प्रत्येक प्रांतात, मंगळसूत्राच्या प्रकारात भिन्नता आहे, परंतु त्याचेमहत्त्व तसेच अबाधित राहते. खास श्रावण-मासाचा पवित्र मुहूर्त साधत सत्यम ज्वेलर्स आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहेत महा मंगळसूत्र उत्सव.

ज्यामध्ये आपणांस सोने आणि डायमंड मंगळसूत्राच्या असंख्य विविध व्हरायटी खरेदीसाठी उपलब्ध आहेत. खास आपल्या ग्राहकांसाठी सत्यम ज्वेलर्स घेऊन आले आहेत महाऑफर, सोन्याच्या मंगळसूत्रांची मजुरी फक्त ६% पासून सुरु आणि हॉलमार्क दागिन्यांच्या एक्सचेंजवर तब्बल १००% सूट. ह्या महाऑफरचा कालावधी दि. १-ऑगस्ट ते २५-ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे. आजच्या आधुनिक युगातही मंगळसूत्राचे महत्त्व कमी झालेले नाही. आजच्या युवतींमध्येही मंगळसूत्राचे आकर्षण तितकेच आहे. फॅशन आणि ट्रेंड्स बदलत असताना देखील मंगळसूत्राचे पारंपारिक महत्त्व कायम आहे. म्हणून सत्यम ज्वेलर्सने खास आपल्यासाठी महा मंगळसूत्र उत्सवात विविध प्रकारचे आणि डिझाइन्सचे मंगळसूत्रे उपलब्ध करून दिले आहेत.

स्त्रियांच्या जीवनातील या खास अलंकाराला अधिक सुंदर आणि खास बनवण्यासाठी सत्यम ज्वेलर्स नेहमीच तत्पर असते. आपल्या प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष सेवेसाठी सत्यम ज्वेलर्सने नेहमीच एक विशेष स्थान मिळवले आहे.

तर मग चला , अप्रतिम सुंदर मंगळसूत्रे खरेदीकरण्यासाठी आजच सत्यम ज्वेलर्सच्या निगडी, कृष्णानगर किंवा चाकण शाखेस भेट द्या. आणि करा मंगळसूत्रांची महाखरेदी !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *