पुण्यात तोतया पोलिसाला अटक ; खाकी वर्दी घालून तरुणांना मारहाण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुलै ।। पुण्यामधून एका तोतया पोलिसाला अटक करण्यात आली आहे. टीम इंडियाने (Team India) टी-२० सामना (T-20 World Cup) जिंकल्यानंतर पुण्यामध्ये तरुणांनी एकच जल्लोष केला. अशामध्ये खाकी वर्दी घालून आलेल्या एका तरुणाने जल्लोष करणाऱ्या तरुणाना मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ शोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या तोतया पोलिसाला पुणे पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खाकी वर्दी घालून पोलिस असल्याची बतावणी करत पुण्यामध्ये एका तरुणाने काही तरुणांना मारहाण केली होती. सुशांत पार्टे असं या तोतया पोलिसाचे नाव आहे. सुशांत मूळचा रायगडचा राहणारा आहे. त्याला पुण्याच्या फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. या तोतया पोलिसामुळे आता पुण पोलिसांकडून नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना संपल्यानंतर पुण्यातील अलका टॉकीज चौकात सुशांत पार्टे हा पोलिसांची वर्दी घालून आला होता. पोलिस असल्याचे सांगत त्याने जल्लोष करणाऱ्या अनेक तरुणांना धमकावलं आणि त्यांना मारहाण सुद्धा केली. मात्र यातील काही तरुणांना तो पोलिस नसल्याचे समजले. या सजग तरुणांनी कंट्रोल रूमला फोन केला.

फरासखाना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुशांतची विचारपूस केली. यावेळी सुशांतने उडवा उडवीची उत्तरं दिली तेव्हा तो तोतया पोलिस असल्याचे निष्पन्न झाले. फरासखाना पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अशा बनावट पोलिसांपासून सावधान राहण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *