महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुलै ।। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA)ने काही दिवसांपूर्वी NEET UG परीक्षा पुन्हा घेतली होती. याच परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. NEET UG परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना ७२० गुण मिळाले होते. त्यामुळेच नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे सांगण्यात येत होते. याच पार्श्वभूमीवर NTA ने २३ जून रोजी विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली होती. याच परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर पुन्हा परीक्षा घेतली होती. १५६३ विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली होती. मात्र, यापैकी फक्त ८१३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. NTA कडून सुधारित रँक यादी जाहीर करण्यात आली आहे.२३ जून रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. या पुन्हा झालेल्या परीक्षेचा निकाल कसा चेक करायचा ते जाणून घ्या.
NTA ने ३० जून रोजी NEET UP या परिक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. हा निकाल तपासण्यासाठी तुम्हाला वेबसाइटवर जाऊन रिझल्टवर क्लिक करुन तुमच्या परीक्षेचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकायची आहे. यानंतर तुमचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. हा निकाल तुम्ही डाउनलोडदेखील करु शकतात. या परीक्षेत किती विद्यार्थी पास झाले आहेत याची आकडेवारी लवकरच समोर येईल. या परीक्षेची मेरीट लिस्ट एनटीएच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर झाली आहे.
नीट निकालानंतर काउंसलिंग ६ जुलैपासून सुरु
नीटच्या परीक्षेच्या निकालानंतर ६ जुलैपासून समुपदेशन प्रक्रिया सुरु होईल. यानंतरच सर्वोच्च न्यायलय अंतिम निकाल देणार आहे. ८ जुलै रोजी याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.