महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुलै ।। आज जुलै महिन्याचा पहिलाच दिवस आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात घट झालीये. तब्बल ३१ रुपयांनी गॅस सिलिंडरच्या किंमती कमी झाल्या आहेत. तसेच आज सोने आणि चांदीचा भाव सुद्धा कमी झाला आहे. भाव कमी झाल्याने आज तुम्ही सोने खरेदीचा विचार करू शकता. गुंतवणूक म्हणून आज तुम्ही सोने खरेदी करू शकता. त्यामुळे आजच्या फ्रेश किंमती काय आहेत त्याची माहिती जाणून घेऊ.
सकाळी ९ वाजता आलेल्या दरांनुसार, आज २२ कॅरेट १०० ग्राम सोन्याच्या किंमती १०० रुपयांनी स्वस्त झाल्यात. त्यामुळे सोन्याचा भाव आज ६,६३,९०० रुपये इतका आहे. तर १० ग्राम सोन्याच्या किंमतीमध्ये सुद्धा घसरण झाली असून आज १० ग्रास म्हणजेच एक तोळा सोन्याचा भाव ६६,३९० रुपये आहे. ८ ग्राम सोनं ५३,११२ रुपये आणि १ ग्राम सोनं ६,६३९ रुपयांनी विकलं जात आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव
आज २४ कॅरेट सोन्याच्या किंमती सुद्धा १०० रुपयांनी कमी झाल्यात. त्यामुळे १०० ग्राम सोन्याचा भाव आज ७,२४,१०० रुपये. १० ग्राम सोन्याचा भाव ७२,४१० रुपये, ८ ग्राम सोन्याचा भाव ५७,९२८ रुपये आणि १ ग्राम सोन्याचा भाव ७,२४१ रुपये इतका आहे.
१८ ग्राम सोन्याच्या किंमती
१८ कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्ये सुद्धा घसरण झाली आहे. १०० ग्राम सोन्याचा भाव आज ५,४३,२०० रुपये. १० ग्राम सोन्याचा भाव ५४,३२० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा भाव ४३,४५६ रुपये. तर १ ग्राम सोन्याचा भाव ५,४३२ रुपये इतका आहे.
विविध शहरांमधील १ ग्राम सोन्याचा भाव काय?
मुंबईमध्ये आज १ ग्राम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,६२४ रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२२७ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ५,४२० रुपये इतका आहे.
पुण्यामध्ये आज १ ग्राम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,६२४ रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२२७ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ५,४२० रुपये इतका आहे.
नवी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,६३९ रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२४१ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ५,४३२ रुपये इतका आहे.
कोलकत्तामध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,६२४ रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२२७ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ५,४१०.५० रुपये इतका भाव आहे.
मेरठमध्ये आज २२ कॅरेट ६,६३९ रुपये, २४ कॅरेट ७,२४१ रुपये आणि १८ कॅरेट ५,४३२ रुपये इतका भाव आहे.
चांदीच्या किंमती
प्रति किलो चांदीच्या किंमची देखील जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी चांगल्याच घसरल्या आहेत. त्यामुळे आज एक किलो चांदीचा भाव ८९,९०० रुपये प्रति किलो आहे.
मुंबईत – ८९,९०० रुपये प्रति किलो
दिल्लीत – ८९,९०० रुपये प्रति किलो
पटना – ८९,९०० रुपये प्रति किलो
जयपूर- ८९,९०० रुपये प्रति किलो
पुणे – ८९,९०० रुपये प्रति किलो
अहमदाबाद – ८९,९०० रुपये प्रति किलो