SBI Alert: ‘या मेसेजपासून सावधान’! एसबीआयचा करोडो ग्राहकांना अलर्ट, होऊ शकत मोठं नुकसान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑगस्ट ।। SBI Alert: तुमचेही स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एसबीआयच्या करोडो खातेदारांसाठी सरकारने अलर्ट जारी केला आहे. सरकारने एसबीआयच्या करोडो खातेधारकांना फसव्या मेसेज पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

आजकाल फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. एसबीआयमधील लोकांची खाती हॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एसबीआयच्या ग्राहकांना मेसेज पाठवून त्यांच्या खात्यातून पैसे काढले जात आहेत. याबाबत सरकारने इशारा दिला आहे.

या मेसेज पासून दूर राहा
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBIचे ग्राहक फसवणुकीचा सामना करत आहेत. याबाबत सरकारने एक सूचना जारी केली आहे. एसबीआयच्या नावाने आलेला कोणताही फेक मेसेज बाबत सावधगिरी बाळगा, असे सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली एसबीआय खातेधारकांची फसवणूक होत आहे. लोकांना ईमेल आणि मेसेजद्वारे रिवॉर्ड पॉइंटचे आमिष दाखवून तसेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या फसव्या मेसेजद्वारे सायबर फसवणूक करून पैसे उकळण्याचा कट सुरू आहे.

या मेसेजमध्ये ग्राहकांना रिवॉर्ड पॉइंट मिळवण्यसाठी APK फाइल अपलोड करण्यास सांगितले जात आहे. असे मेसेज सोशल मीडियाद्वारे लोकांना पाठवले जात आहेत. याप्रकरणी बँकेने प्रतिक्रिया दिली आहे. पीआयबीने फॅक्ट चेक करुन हा मेसेज खोटा आणि फसवा असल्याचे सांगितले आहे.

एसबीआयने असेही म्हटले आहे की असे मेसेज चुकीचे आहेत आणि एसबीआय कधीही आपल्या ग्राहकांना एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे कोणतीही लिंक पाठवत नाही. लोकांना बँक आणि सरकारकडून एपीके फाइल डाउनलोड न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लोकांना अत्यंत सतर्क आणि सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *