महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑगस्ट ।। इंग्लंडचे माजी फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांचं आज निधन झालं. थॉर्प यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते, अशी माहिती मिळाली आहे. थार्प यांचा १ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. त्यांनी चार दिवसांनंतर आज त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. थार्प यांनी तीन वेळा इंग्लंडचं कर्णधारपद भूषवलं होतं. त्यांच्या निधनामुळे क्रीडाविश्वात मोठी शोककळा पसरली आहे.
दिग्गज क्रिकेटपटूनं घेतला जगाचा निरोप
इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डने त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करून या घटनेची माहिती दिली आहे. ग्राहम थोर्प यांचं निधन झालं, हे सांगताना अतिशय दु:ख होत असल्याचं इंग्लंड क्रिकेट बोर्डने म्हटलं आहे. थार्प नेमक्या कोणत्या आजारामुळे व्यथित (England Cricketer Graham Thorpe) होते, याबद्दल कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. १०० कसोटी सामने खेळणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांमध्ये थॉर्प यांचा समावेश होता. त्यांनी भारताविरुद्ध ५ कसोटी सामने खेळले (Cricket News) होते.
It is with great sadness that we share the news that Graham Thorpe, MBE, has passed away.
There seem to be no appropriate words to describe the deep shock we feel at Graham's death. pic.twitter.com/VMXqxVJJCh
— England and Wales Cricket Board (@ECB_cricket) August 5, 2024
क्रीडाविश्वात शोककळा
ग्राहम यांनी ऑस्ट्रेलियामधून कोचिंग करिअरची सुरूवात केली होती. जिथे त्यांनी स्टीव्ह स्मिथ आणि डेनिड वार्नर यांसारख्या खेळांडूंसोबत काम केलं होतं. त्यानंतर ते इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डमध्ये फलंदाज कोच म्हणून सामील झाले (Graham Thorpe Death) होते. थॉर्प केवळ एक फलंदाच नव्हते तर ते एक उत्कृष्ट प्रशिक्षक देखील होते. त्यांनी २००५ मध्ये साऊथ वेल्सचे प्रशिक्षकपद भूषवले होते. त्यानंतर थार्प इंग्लंड लायन्सचे प्रशिक्षक बनले. २०१३ मध्ये ते इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचे फलंदाजी प्रशिक्षक बनले होते.
क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचं निधन
ग्रॅहम यांची कारकीर्द
ग्रॅहम थार्प हे डावखुरे फलंदाज होते. त्यांनी इंग्लंडकडून १०० कसोटी सामने खेळले होते. त्यांच्या नावावर ६७४४ धावांचिी नोंद आहे. या काळात त्यांनी इंग्लंडकडून ८२ एकदिवसीय सामने खेळले (England Cricketer) होते. ज्यामध्ये त्यांच्या नावावर २३८० धावांची नोंद आहे. ग्रॅहम यांनी वनडेमध्ये २१ अर्धशतके केली होती. ग्रॅहम थॉर्प यांना इंग्लिश काउंटी क्रिकेटचे दिग्गज म्हटलं जातं.