Pimpri-Chinchwad Rain Update : पिंपरी चिंचवडला आज पावसाचा दिलासा, बारीक भुर भुर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑगस्ट ।। गेले काही दिवस राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने झोडपून काढले आहे. काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुणे (pune rain update) जिल्ह्यातील डोंगर भागात व धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. खाली वाहणाऱ्या भीमा आणि मुळामुठा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्‍यामुळे हवेली, दौंड, शिरूर या भागातील नदीपात्रावरील बंधारे व काही ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत. (pimpri-chinchwad floods)

पुण्यातील सध्याची पावसाची स्थिती पाहता जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी दि.४ रोजी रात्रीपासूनच ठिकठिकणच्या पुलावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे. तसेच नदीकाठचे हजारो एकर शेतीक्षेत्र पाण्याखाली गेले असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान गेल्या २४ तासातील पुण्यातील विविध ठिकाणी किती मिमी प्रमाणात पाऊस पडला आहे हे पाहू. पाऊस मिमी (मिलीमीटर) मध्ये

लोणावळा – ८६.५

माळिन – ४६.०

वडगावशेरी – ३९.५

शिवाजीनगर -३८.७

चिंचवड – ३७.०

पाषाण – ३४.८

खेड – ३३.०

तळेगाव २८.५

दापोडी – २७.५

धामधरे – २२.५

नारायणगाव – १८.०

एनडीए – १७.०

राजगुरुनगर १६.५

आंबेगाव – १४.०

हडपसर – १३.०

लवाळे – १३.०

हवेली – ११.५

दौंड – २.५

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग कमी करून दुपारी २.०० वाजता २१ हजार १७५ क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व आवकनुसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *