![]()
महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – कोरोना सारख्या महामारीच्या साथी मूळे गेल्या चार महिन्या पासून लाॅकडावुन मुळे सर्वांचे उद्योगधंदे, व्यवसाय व नोकरी बंद पडल्यामुळे सर्वांचे उत्पन्ना चे मार्ग बंद झाले असल्यामुळे त्यांनीे घेतलेल्या कर्जांचे हप्ते भरू शकत नाहीत व अजुनही कीती महीने हप्ते भरू शकणार नाहीत अशी परीस्थिती समोर दिसत आहे म्हणून बँकावर नाॅन परफाॅरमन्स अॅसेटस (NPA) ची वाईट वेळ येवू नये बँकांनी केंद्रीय वित्तंमंत्री निर्मला सितारामनजी यांना मोरोटोरीयम पिरीयड वाढविण्यासाठी विनंती आहे केली आहे.
कारण बँकांची स्थिती एन.पी.ए. गेली तर त्या बँकांचे व्यवसाय डबघाईत गेले असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो त्यामुळे जनतेचा सदर बँकां वरचा आर्थिक विश्वास कमी कमी होत जातो परिणामी त्या बँकांवरची विश्वासर्हता कमी होत जाते.म्हणून बँकांनी वित्तँ मंत्री निर्मला जी सितारामन यांना मोरोटोरीयम पिरीयड वाढविण्यासाठी विनंती केली आहे . सदर बँकांच्या विनंती नुसार कर्ज फेडण्याच्या मुदतवाढीत ( मोरोटोरीयम पिरीयड ) नोव्हेंबर ‘2020 पर्यंत वाढ होण्या ची शक्यता आहे.
लवकरच त्या बाबतीत अधीकृत निर्णय जाहीर केला जाईल असे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला जी सितारामन यांनी म्हटल आहे. त्या मुळे जनतेला कोरोना महामारी मुळे उदभव्लेल्या आर्थीक संकटात दिलासा मिळणार आहे. व्याजा पासुन सुटका मिळण्याची शक्यता खुप कमी आहे. व्याज माफी च्या बाबतीत ला निकाल आॅगस्ट’ 2020 च्या पहिल्या आठवड्यात उच्च न्यायालयात लागणार आहे. परंतु नोव्हेंबर पर्यंत मोराटोरीयम पिरीयडची वाढ झाली तर जनतेला कर्जवसूलदारांपासून सुटका मिळणार आहे.
