4 महिन्यांत पहिल्यांदाच मास्क घालून बाहेर पडले डोनाल्ड ट्रम्प

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – वॉशिंग्टन, 12 जुलै : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आतापर्यंत मास्क घालण्यास नकार दिला होता. मार्चमध्ये सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा कहर जगभरात दिसत असताना ट्रम्प यांनी कधीच मास्कचा वापर केला नाही. मात्र शनिवारी (11 जुलै) रोजी पहिल्यांदाच ट्रम्प सार्वजनिक ठिकाणी मास्क घालताना दिसले.

अमेरिकेत आतापर्यंत 32 लाखाहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे तर 1.34 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सैनिकी रुग्णालयाला भेट देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मास्क घातला. 4 महिन्यात प्रथमच आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचना ट्रम्प यांनी मान्य केल्या आणि सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *