महाराष्ट्र 24 – ऑनलाईन- पिंपरी-चिंचवड:- दि, १० ऑगस्ट शनिवार रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन गंज पेठ पुणे येथे होत असलेल्या सकल धनगर समाज, महाराष्ट्र राज्य अधिवेशनास पिंपरी-चिंचवड शहर सकल धनगर समाज बांधवांनी मोठ्याप्रमाणात उपस्थितीत रहावे सदर अधिवेशनात सरकारवर दबाव आणण्यासाठी सर्वानी संघटीत होऊन अंदोलन , मोर्चा , उपोषण सकल धनगर समाज या नावाखाली करायवयची आहेत यांची चर्चा , विचार विनिमय करायाचा आहे शहरातील सर्व संघटना , समाजिक कार्यकर्ते , सर्वपक्षीय कार्यकर्ते , उपोषणकर्ते , याचिकाकर्ते समाज बांधव यांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन लढा उभा करायचा आहे आपल्यासाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी अधिवेशनास येताना आपल्या सोबत पाच ते दहा समाज बांधव घेऊन यावे असे आवाहन मल्हार आर्मी शहर अध्यक्ष दिपक भोजने यांनी केले.