महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑगस्ट ।। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज पुण्यात होणार आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे ठाम असून त्यांच्या रॅलीचे आज पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. सारसबाग येथील गणपतीचे दर्शन आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करून रॅलीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास अभिवादन केल्यानंतर रॅलीची सांगता होईल. सकाळी 11 वाजता शांतता रॅली सुरु होईल.
जरांगे यांच्या रॅलीला मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जमण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे बाहेर पडणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. मनोज जरागेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहेत. आज दुपारी १२ वाजता शांतता रॅली सारसबाग येथून सुरु होईल. डेक्कनच्या खंडुजी बाबा चौकात संध्याकाळी सहा वाजता रॅलीचा समारोप होईल.
कुठले रस्ते चालू आणि कुठले रस्ते बंद?
-सिंहगड रस्त्यावरून येणारी वाहतूक दांडेकर पूल, सावरकर चौक, मित्रमंडळ चौक व व्होल्गा चौक अशी वळविण्यात आली आहे
-एस पी कॉलेज चौक: पूरम चौकाकडे वाहतूक बंद राहील
-जेधे चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील
रॅली निघाल्यानंतर करण्यात येणारे बदल
-कुमठेकर रस्त्यावर शनिपार चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील
-लक्ष्मी रस्त्यावर बेलबाग चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील
-अप्पा बळवंत चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील
-मंगला टॉकीज प्रिमिअर गॅरेजकडे जाणारी वाहतूक बंद राहील
-शिवाजीनगर न्यायालयाकडून येणारी वाहतूक बंद राहील
-रॅली जंगली महाराज रस्त्यावर आल्यानंतर करण्यात येणारे बदल
-केळकर रस्त्यावरून वाहतूक बंद राहील
-भिडे पूल पुलाची वाडी येथून जंगली महाराज रोडला वाहतूक बंद राहील
-खंडोजीबाबा चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील