महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट ।। इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केल्यानंतर करदात्यांच्या अकाउंटमध्ये रिफंड जमा होतो. आयटीआर फाइल केल्यानंतर साधारण ४-५ आठवड्यानंतर हा परतावा करदात्यांच्या अकाउंटमध्ये जमा होतो. त्यामुळे आता लवकरच करदात्यांच्या अकाउंटला रिफंड जमा होऊ शकतो. मात्र, अनेकदा करदात्यांच्या अकाउंटला रिफंड जमा होत नाही. जर तुमच्याही अकाउंटला रिफंडचे पैसे जमा न झाल्यास काय करावे? जाणून घ्या.
आयकर रिफंड मिळवण्यासाठी अनेक घटक काम करत असतात. यापैकी जर एखादा घटक डिफॉल्ट असेल तर आयकर रिफंड मिळवण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे अनेकदा करदात्यांना टेन्शन येते. मात्र, काही दिवसांनी तुमच्या अकाउंटला परताना जमा होईल.
जर तुमचा परतावा वेळेत मिळाला नाही तर या गोष्टी करा. जेणेकरुन तुमच्या परताव्याची रक्कम लगेच तुमच्या अकाउंटला जमा होईल, याबाबत प्राप्तिकर विभागाने माहिती दिली आहे.
जर तुमचा आयकर रिफंड मुदतीपेक्षा खूप काळ झाला असला तरी तुमच्या अकाउंटला जमा झाले नसेल तर तुम्ही रिफंड री इश्यू फाइल करा. यानंतर तुम्ही रिफंडसाठी पुन्हा एकदा अप्लाय करत आहात. यानंतरही कर परताव्याची रक्कम तुमच्या अकाउंटला जमा न झाल्यास तुम्ही प्राप्तिकर विभागाकडे तक्रार करु शकता.
आयटीआर रिफंड करदात्यांच्या अकाउंटमध्ये जमा होण्यासाठी काही प्रक्रिया असतात. प्राप्तिकर विभाग तुमचा आयटीआर व्हेरिफाय करतात. त्यानंतरच तुमच्या अकाउंटला आयकर रिफंड जमा करतात.आयकर रिफंड मिळण्यात ४-५ आठवडे लागतात. त्यानंतरही जर तुमच्या अकाउंटला रिफंड जमा झाला नाही तर तुम्ही प्राप्तिकर विभागाला तक्रार करु शकता.