Rubbing Hands on Hands Benefits : सकाळी उठल्या उठल्या पहिले करा हे काम ; होतील आश्चर्यकारक फायदे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट ।। स्ट्रेस आणि तणाव वाढल्यास आपण विविध गोष्टी करतो. काही व्यक्ती व्यायाम करतात. तर काही जण योगा सुद्धा करतात. आता तुम्ही शाळेत असताना पसायदान म्हटलंच असेल. पसायदान झालं की, हातावर हात चोळून डोळ्यांवर फिरवले जायचे. आता हे असं का केलं जात होतं. तसेच हे केल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो याची माहिती आज जाणून घेऊ.

बुद्धीवर परिणाम
ज्या व्यक्तींना मेंटल स्ट्रेस आहे त्यांना कोणतेही काम करताना त्यात मन लागत नाही. त्यामुळे अशावेळी हातावर हात चोळले पाहिजेत. असं केल्याने आपली एकाग्रता वाढते आणि मन एका ठिकाणी लागते. तसेच विचार करण्याची आपली क्षमता आणखी वाढते.

दृष्टी प्रखर होते
जेव्हा आपण हात एकमेकांवर चोळतो तेव्हा हात गरम होतात. ही उष्णता आपण डोळ्यांवर लावली की, डोळे शांत होतात आणि आपल्याला डोळ्यांच्या काही समस्या असतील तर त्या काही वेळासाठी कमी जाणवतात. डोक्यातील वाईट विचार निघून जातात आणि मनात सतत सकारात्मक विचार येतात. दिवसभर आपल्यात आत्मविश्वास राहतो.

एनर्जी
हात एकमेकांवर चोळताना आपल्या हातांवर असलेल्या एक्युप्रेशर पॉइंट्सवर दाब वाढतो. यामुळे शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत सुरू राहतो. शरीरातील उष्णता वाढते आणि आपण स्वत:ला तंदुरुस्त फिल करतो.

तणाव मुक्त
आयुर्वेद आणि योगाच्या दृष्टीने विचार केला तर दररोज काही मिनिटे हात एकमेकांवर अशा पद्धतीने चोळल्याने आपला तणाव कमी होतो. तसेच याने शरीरात असलेला अशक्तपणा कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते.

फेक्सेबिलिटी
जेव्हा तुम्ही हातांची अशा पद्धतीने हालचाल करता तेव्हा हातांमध्ये असलेलं दुखणं बंद होतं. तसेत तुमच्या हातांची हालचाल झाल्याने त्यांमधील फेक्सेबिलिटी आणखी वाढते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *