Vinesh Phogat: विनेश फोगाटला सिल्व्हर मेडल मिळणार? CAS निर्णय देणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट ।। Vinesh Phogat Disqualification Result: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) शानदार खेळ करत पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश केला होता. ५० किलोग्रॅम वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात तिने आपलं एक पदक निश्चित केलं होतं.

मात्र फायनलच्या सामन्यापूर्वी १०० ग्रॅम वजन अधिक असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळे तिचं हक्काचं पदक हुकलं. दरम्यान तिने CAS कडे याबाबत दाद मागितली आहे.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्यासोबत अन्याय झाला आहे. त्यामुळे हक्काचं रौप्य पदक देण्यात यावं यासाठी विनेश फोगाटने CAS कडे दाद मागितली आहे. तिची विनंती CAS ने मान्य केली असून आज (१३ ऑगस्ट) याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान निकाल लागण्यापूर्वी विनेश फोगाट ऑलिम्पिक विलेजमधून बाहेर पडली आहे.

नेमकं काय घडलं?
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत विनेश फोगाट ५० किलोग्रॅम वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात खेळण्यासाठी उतरली होती. या स्पर्धेत तिने वर्ल्ड नंबर १ खेळाडूला पराभूत केलं. त्यानंतर सुवर्ण पदक जिंकणाऱ्या अमेरिकेच्या सारा हिड्लेब्रांटला बाहेर केलं.

या विजयासह तिने आपलं एक पदक निश्चित केलं. मात्र फायनलच्या सामन्यापूर्वी अचानक तिचं वजन वाढलं. तिने रात्रभर वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. मात्र १०० ग्रॅम वजन राहीलच, त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं.

CAS कडे मागितली दाद
अपात्र ठरवल्यानंतर तिने CAS कडे दाद मागितली. तिने आपली बाजू मांडत रौप्य पदक देण्याची मागणी केली आहे. या स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या गुजमेन लोपेझला विनेशने सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत केलं होतं. मात्र विनेश फोगाट अपात्र ठरल्याने तिला फायनल खेळण्याची संधी मिळाली. फायनलमध्येही तिला पराभवाचा सामना करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *