महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑगस्ट ।। आगामी विधानसभा निवडणूकीसाठी अजित पवारांनी मला आशिर्वाद द्यावेत असं विधान अजितदादांचे पुतणे आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांनी केले आहे.
बारामतीतून आता अजित पवार यांच्या जागी त्यांचा मुलगा जय पवार, यांच्या उमेदवारीचे स्वतः अजित पवार यांनी संकेत दिल्यानंतर, जय विरुद्ध त्याचा चुलत भाऊ युगेंद्र पवार अशी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अद्याप युगेंद्र पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी अजित पवार साहेबांचा आणि कुटुंबाचा आशिर्वाद असेल तर विचार करायला हरकत नाही, अस वक्तव्य युगेंद्र पवार यांनी केलं आहे.