Whatsapp Colour Change : व्हॉट्सॲप होणार कलरफुल; अपेडटमध्ये आलं नवीन फीचर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। WhatsApp Chat Bubble Theme Feature : व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच काही ना काही नवीन फीचर्स घेऊन येत असते.त्यामध्ये व्हॉइस स्टेटस,फेवरेट चॅट,मेटा एआय सारखी कृत्रिम बुद्धिमत्तेची सुविधा आणि बरेच फीचर्स व्हॉट्सॲपने आणले आहेत. भविष्यातही अनेक नवीन पिक्चर सांगण्याच्या मार्गावर आहे अशात जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने आणखी एकदा आपल्या यूजर्सना खुश करण्याची तयारी केली आहे.

अलीकडच्या बीटा व्हर्जनमध्ये दिसून आलेल्या नव्या फीचरनुसार लवकरच व्हॉट्सॲपवर चॅट बबल रंगीबेरंगी होणार आहेत.

व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमध्ये लवकरच एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे ज्यामुळे वापरकर्ते आपल्या आवडीच्या रंगाचे चॅट बबल निवडू शकतील. यामुळे ॲपचा लूकही बदलणार आहे. मात्र, या नव्या फीचरबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, व्हॉट्सॲप लवकरच आपल्या ॲपमध्ये आणखी काही नवीन फीचर्स आणि रिफ्रेश्ड इंटरफेसही आणणार आहे. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे व्हॅरिफिकेशन टिक मार्कचा रंग हिरवाऐवजी निळा होणार आहे.

याआधी व्हॉट्सॲपवर सत्यापित बिझनेस अकाउंट्सना हिरवा बॅज दिसायचा. मात्र, आता हा रंग बदलून निळा करण्यात येणार आहे. यामुळे व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक या सर्वच प्लॅटफॉर्मचा लूक एकसारखा होणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना कोणत्याही प्लॅटफॉर्मवर सत्यापित बिझनेस अकाउंट्स सहज ओळखता येतील.

हे फीचर सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.हिरव्या रंगाचा बॅज दिसल्यानंतर ते प्लॅटफॉर्म विश्वासार्ह आहे,हे स्पष्ट होईल. या नव्या अपडेटबद्दल सध्या जास्त माहिती उपलब्ध झालेले नाही. पण काही दिवसांमध्ये पुढच्या अपडेटसह हे नवे फीचर्स म्हणजेच व्हॉट्सॲप चॅट बबल थीम आणि व्हॉट्सॲप बिजनेस अकाउंटमधील बॅजचा रंग बदलण्याचे फीचर लवकरच आपल्या फोनमध्ये येईल. या नव्या फीचर्समुळे व्हॉट्सॲपचा वापर आणखी मनोरंजक होणार आहे यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *