Dinesh Phadnis: CID फेम ( ‘फ्रेडी’ ) दिनेश फडणीस यांचं निधन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ डिसेंबर।। ‘सीआयडी’ या लोकप्रिय शोमध्ये फ्रेडी (फ्रेडरिक) ची भूमिका साकारणारे दिनेश फडणीस हे गेल्या काही दिवासांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरु होते.

मात्र त्यांची आजाराशी झुंज अपयशी ठरली. काल रात्री म्हणजेच ४ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंबधितचे वृत्त दिले आहे. 1 डिसेंबरच्या रात्री त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तुंगा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

दिनेश यांचे सहकलाकार आणि ‘सीआयडी’ अभिनेता दयानंद शेट्टी यांनी सांगितले होते की यकृत निकामी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *