महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑगस्ट ।। आज 19 ऑगस्टला आपण एक दुर्मिळ खगोलीय घटना पाहणार आहोत. टी म्हणजे सुपर ब्लू मून. रक्षाबंधनाच्या दिवशी आकाशात चंद्र आपल्याला एक खास भेट देणार आहे. आजचा चंद्र फक्त पौर्णिमेचाच नाही तर तो सुपर मून आणि ब्लू मूनही आहे. या तीनही घटना एकाच वेळी घडणे ही खरोखरच एक दुर्मिळ घटना आहे.
सुपर मून काय आहे?
चंद्र पृथ्वीभोवती फिरताना त्यांच्यातील अंतर कधीकधी कमी आणि कधीकधी जास्त होते. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्याच वेळी पौर्णिमा असते, तेव्हा त्याला सुपर मून म्हणतात. सुपर मून साधारणतः 30% अधिक उजळ आणि 14% अधिक मोठा दिसतो. चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा या दोन पिंडांमधील अंतर सतत बदलत राहते. कधीकधी चंद्र पृथ्वीपासून सर्वात दूर (405,500 किलोमीटर) असतो आणि काहीवेळा तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो (363,300 किलोमीटर).सुपरमून हा शब्द सर्वप्रथम शास्त्रज्ञ रिचर्ड नोल यांनी १९७९ मध्ये वापरला होता.
नासाच्या रिपोर्टनुसार, 19 ऑगस्टपासून पुढील तीन दिवस म्हणजे रविवाररी सकाळपासून ते बुधवारी सकाळपर्यंत पौर्णिमा दिसणार आहे. एका वर्षात चार सुपरमून दिसतात. पहिला सुपर मून आज (19 ऑगस्ट) दिसणार आहे, जेव्हा सुपर मून आणि ब्लू मून एकत्र येतात, त्याला ‘स्टर्जन मून’ म्हणतात.
ब्लू मून म्हणजे काय?
ब्लू मून म्हणजे चंद्र निळा होणे असे नाही. हे नाव त्याच्या रंगावरून नाही तर त्याच्या दुर्मिळतेवरून पडले आहे. एकाच वर्षात चार पौर्णिमा आल्यास तिसऱ्या पौर्णिमेला ब्लू मून म्हणतात.
सुपर ब्लू मून का इतका खास आहे?
सुपर मून आणि ब्लू मून हे दोन्ही स्वतःमध्ये खूप विशेष आहेत. पण जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा ही घटना अत्यंत दुर्मिळ होते. अशी घटना दर 10 वर्षांनी एकदाच घडते. पुढचा सुपर ब्लू मून 2037 मध्ये दिसणार आहे.
चंद्र कधी निळा दिसू शकतो?
खरं तर, काही विशिष्ट परिस्थितीत चंद्र निळा दिसू शकतो. जेव्हा हवेत धूळ किंवा ज्वालामुखीचा राख असतो तेव्हा चंद्राचा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून जाताना निळा दिसू शकतो.
तर मग आज रात्री आकाशात नजर ठेवा आणि या सुपर ब्लू मूनचा अद्भुत नजारा अनुभवा. ही एक अशी घटना आहे जी पुन्हा लवकरच घडणार नाही. सुपर ब्लू मून पाहण्यासाठी कोणत्याही खास उपकरणांची गरज नाही.त्यामुळे आपल्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत किंवा एकटे बसून या खास क्षणाचा आनंद घ्या.