Breaking – बदलापूरातील रेल रोकोमुळे तीन तासांपासून कल्याण- कर्जत रेल्वेसेवा ठप्प, आंदोलकांचा हटण्यास नकार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट ।। बदलापूर शहरातील आदर्श शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. त्याविरोधात संतप्त बदलापूरकरांनी मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास बदलापूर स्थानकात रेल रोको केला. त्यामुळे गेल्या तीन तासांपासून कल्याण- कर्जत रेल्वेसेवा ठप्प आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा असून पोलीस आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवरून हटण्यास नकार दिला आहे.


बदलापूर शहरातील आदर्श शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. मंगळवारी या घटनेविरोधात संतप्त बदलापूरकरांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *