केजरीवालांच्‍या न्‍यायालयीन कोठडीत २७ ऑगस्‍टपर्यंत वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट ।। दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यघतील सीबीआय प्रकरणी आज ( दि. २०) दिल्‍लीच्‍या राऊस एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी २७ ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने २६ जून रोजी तिहार तुरुंगातून अटक केली होती. ईडीने दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ते न्यायालयीन कोठडीत असताना ही कारवाई करण्‍यात आली . केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने अबकारी धोरण प्रकरणात केजरीवाल आणि इतरांविरुद्ध दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआय आणि ईडीने आता अबकारी घोटाळ्याप्रकरणातील चौकशी पूर्ण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *