बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा करा. प्रा. कविता आल्हाट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट ।। बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे .यानंतर संतप्त झालेल्या पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने आज या घटनेचा निषेध व्यक्त केला गेला. प्रा कविता आल्हाट म्हणाल्या की ,महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर चालणारा आहे ,या महाराष्ट्रात महिलाना सन्मानाने वागणूक मिळते ,पण वारंवार अत्याचाराच्या घटना या लागोपाठ महाराष्ट्रात घडत आहे , या घटना घडत असताना सरकारने प्रशासनाला सूचना करुन त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत , महाराष्ट्र राज्य माहीला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही आयोगाकडून कडक कार्यवाही करू असे म्हंटले आमची मागणी अशीच आहे ,की त्या नराधमांस फाशीची शिक्षा व्हावी, तसेच एक समाज म्हणुन आपल्याला मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे, बदलापूरमधे घडले ते अतिशय दुर्दैवी आहे.युवक अध्यक्ष शेखर काटे म्हणाले, खरच ही दुर्दैवी घटना आहे अंगावर शहारे आणणारी घटना आहे असे कृत्य करणाऱ्यास फाशीची शिक्षा व्हावी अशीच आमची मागणी आहे .यावेळी युवक अध्यक्ष शेखर काटे वरीष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे,ओबीसी सेलअध्यक्ष विजय लोखंडे ,कार्याध्यक्ष ज्योती गोफणे, अर्बन सेल अध्यक्ष मनिषा गटकळ, कार्याध्यक्ष पूनम वाघ आशा मिसाळ पिंपरी विधानसभा अध्यक्ष अक्षय माचरे, शहर कार्याध्यक्ष तुषार ताम्हणे, उद्योग व व्यापार श्रीकांत कदम इत्यादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *