कोरोना महामारी आणि त्यामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील घर खरेदी 54 टक्क्यांनी घसरली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – कोरोना संकट आणि त्यामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे बांधकाम क्षेत्राला जबरदस्त फटका बसला आहे. देशातील आठ महत्वाच्या शहरांमध्ये घरांची मागणी 54 टक्क्यांनी घसरली आहे. जानेवारी ते जून या कालावधीत या शहरांमध्ये फक्त 59538 घरे विकली गेली. गेल्या दहा वर्षातील हा सर्वात कमी आकडा आहे.

‘नाईक प्रँक’ या मालमत्ता सल्लागार कंपनीने ‘इंडिया रिअल इस्टेटः एच1 2020’ हा अहवाल नुकताच जाहीर केला. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांमध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत घरांची मागणी 27 टक्क्यांनी घसरली. फक्त 49905 घरे विकली गेली. लॉकडाऊन वाढल्यानंतर हा आकडा आणखीच घसरला. एप्रिल ते जून या कालावधीत फक्त 9632 घरे विकली गेली. चालू वर्षाच्या दुसऱया तिमाहीत दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद या शहरांमध्ये घर विक्रीचे प्रमाण जवळजवळ शून्य टक्केच राहिले असे या अहवालात म्हटले आहे.

जानेवारीपूर्वीच्या दोन वर्षात घरांची मागणी वाढली होती. पण त्यानंतर घर खरेदीचा आलेख घसरत गेला. 2019 मध्ये 1 लाख 29 हजार 285 घरे विकली गेली होती. चालू वर्षामध्ये पुणे आणि चेन्नईमध्ये घर खरेदीचे प्रमाण फक्त 5.8 टक्के इतकेच राहिले. घर खरेदीला चांगला प्रतिसाद देणाऱया आयटी क्षेत्रातील ग्राहक असूनही हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये हे प्रमाण अनुक्रमे 6.9 टक्के आणि 3.3 टक्के राहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *