महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लंडन : राज्यात आज ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४९ हजार ००७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ७ हजार ६६५ रुग्णांवर ( ऍक्टिव्ह ) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख ७२ हजार नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ६६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ९८ हजार ८५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
