ICC Chairman Election : जय शहा ‘आयसीसी’चे अध्यक्ष होणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी कार्यकाळ संपल्यानंतर मंगळवारी (दि.20) तिसऱ्या टर्मच्या शर्यतीतून माघार घेतली. यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह आयसीसीचे नवे अध्यक्ष होतील, अशा चर्चेला उधाण आले आहे.

आयपीएलमधून बीसीसीआयची बंपर कमाई
आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 27 ऑगस्ट ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. एखाद्या व्यक्तीला आयसीसीचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी तीन वेळा मिळते. आयसीसी अध्यक्ष प्रत्येकी दोन वर्षांच्या तीन टर्मसाठी पात्र ठरु शकतात. बार्कले यांनी आतापर्यंत चार वर्षे पूर्ण केली आहेत.

युवराज सिंगच्या आयुष्यावर येणार बायोपिक
आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी बोर्डाला सांगितले आहे की, नोंव्हेंबर अखेरीस माझ्या कारकिर्दीचा कार्यकाळ संपल्यावर पुन्हा अध्यक्ष पदासाठी अर्ज करणार नाही. बार्कले यांची नोव्हेंबर 2020 मध्ये ICC चे स्वतंत्र अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली हाेती. 2022 मध्ये त्यांची या पदावर फेरनिवड झाली हाेती.

‘हे’ आहेत आयसीसी अध्यक्षांसाठी नियम
‘आयसीसी’च्या नियमांनुसार अध्यक्षपदाच्या निवडणूकीत एकूण 16 मते आहेत. यामध्ये एकपेक्षा अधिक अर्ज आले. तर पदासाठी निवडणूक होईल. यामध्ये जास्त मते असलेला उमेदवाराची आयसीसीचे नवीन अध्यक्ष म्हणून घोषणा केली जाईल. अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अर्ज साादर करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे. तर, निवडणून आलेल्या अध्यक्षांचा कार्यकाळ 1 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे.

आयसीसी अध्यक्षांच्या कार्यकाळात बदल
आयसीसी अध्यक्षांच्या कार्यकाळात बदल करण्यात आला आहे. याआधी एखादी उमेदवार तीन वेळा आसीसीचा अध्यक्ष होऊ शकत होता. तो कार्यकाळाची एक टर्म 2 वर्षांची होती. परंतु, नवीन नियमांनुसार, एखादी व्यक्ती दोनदा अध्यक्ष होऊ शकते आणि प्रत्येक कार्यकाळ 3 वर्षांचा असेल.

आयसीसीच्या अध्यक्ष पदासाठी जय शहा अर्ज करणार
बीसीसीआयचे सचिव जय शहा आयसीसीच्या अध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. 2019 साली जय शहा यांनी बीसीसीआच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. 2025 मध्ये त्यांच्या सचिव पदाच्या कारकिर्दीला 6 वर्षे पूर्ण होत आहेत. यासह जय शहा सध्या आयसीसीमध्ये आर्थिक आणि व्यावसायिक प्रकरणांचे प्रमुख आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *