महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ ऑगस्ट ।। जगभरातील बहुतांश पुरुषांचा स्पर्म काऊंट कमी होत असल्याचं दिसून येतंय. गेल्या ४५ वर्षांमध्ये हे प्रमाण अर्ध्यापेक्षा कमी झाल्याचं दिसून आलं. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, याचा सर्वाधिक परिणाम हा भारतातील पुरुषांवर होतो. नुकतंच प्रकाशित झालेल्या एका जर्नलमध्ये सांगण्यात आलं आहे की, १९७३ नंतर स्पर्म काऊंट सातत्याने कमी होत असल्याचं पहायला मिळतंय.
‘ह्यूमन रिप्रोडक्शन अपडेट’ जर्नलमध्ये हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे. दरम्यान स्पर्म काऊंट कमी झाल्यामुळे वंध्यत्वाची समस्या सामान्य होतेय. तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, येणाऱ्या काळात पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट अधिक वेगाने कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान हा चिंतेचा विषय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
दरम्यान स्पर्म काऊंटमध्ये घट का होते आणि स्पर्म काऊंट नेमका किती असला पाहिजे याची माहिती घेऊया.
का होते स्पर्म काऊंटमध्ये घट?
आपले खाद्यपदार्थ आणि हवेच्या माध्यमातून शरीरात एंडोक्राइन डिसरप्टिंग हे केमिकल पोहोचतं. जे शरीरातील दुसऱ्या हार्मोन्सवर परिणाम करतं.
प्रदूषणामुले पुरुषांचा स्पर्म काऊंट कमी कोण्याची शक्यता असते.
अतिप्रमाणात धूम्रपान आणि मद्यपान यांच्यामुळे स्पर्म काऊंटवर परिणाम होतो.
लठ्ठपणा आणि अनहेल्दी पदार्थांचं सेवन केल्याने स्पर्म काऊंट कमी होतो.
पुरुषांमध्ये असणारं सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरोन असंतुलित झाल्यानंतरही यावर परिणाम होतो.
स्पर्म काऊंट किती असला पाहिजे?
जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, हेल्दी स्पर्म, स्पर्मची संख्या, आकार आणि त्याची मोबिलीटी यावरून हेल्दी सीमन असल्याचं निश्चित केलं जातं. वयाच्या 35 व्या वर्षी सीमेनचा दर्जा खराब होऊ लागतो, असं मानलं दातं. संख्येच्या दृष्टीने १ मिली वीर्यामध्ये १.५ कोटी स्पर्म असतात. जर त्यांची संख्या खूप कमी झाली तर जोडीदाराला गर्भधारणा करण्यात अडचणी येतात. स्त्रीच्या गर्भधारणेसाठी पुरुषांच्या स्पर्मची मूवमेंट आवश्यक असते.
स्पर्म काऊंट कमी झाला हे कसं समजू शकतं?
चाचणीशिवाय कोणत्याही पुरुषाला स्पर्मची संख्या कमी झालीये हे समजू शकत नाही. पुरुषाच्या वीर्यातील स्पर्मची संख्या कमी होतेय की नाही हे तपासण्यासाठी सीमेन एनालिसिस टेस्ट केली जाते.