पिंपरी-चिंचवड: ] दिवसा ढवळ्या ५० तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटले केली लंपास

Spread the love

महाराष्ट्र २४ :पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळी दहाच्या सुमारास दोन अज्ञातांनी व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. २ लाख ८० हजार रुपये रोख रक्कम आणि ५० तोळे सोन्याचे (मिक्स) दागिने घेऊन अज्ञात दुचाकीस्वारांनी पोबारा केला. दरम्यान, आरोपींचा शोध पिंपरी पोलीस आणि गुन्हे शाखा क्रमांक एकचे अधिकारी घेत आहेत. रवी मेहता (७१) असे व्यापाऱ्याचे नाव आहे. या घटनेमध्ये त्यांच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे.
पिंपरीच्या मुख्य चौकात एका व्यापाऱ्याला अज्ञात दोघांनी भरदिवसा लुटल्याचा प्रकार घडला. रवी मेहता हे मूळ पंजाब येथील आहेत. मेहता हे सोन्याचे आणि चांदीचे दागिने परराज्यात नेऊन विकतात.सकाळी दहाच्या सुमारास २ लाख ८० रोख रक्कम आणि ५० तोळे सोन्याचे (मिक्स) दागिने घेऊन ते चिंचवडला जाणार होते. रवी मेहता पायी पिंपरी चौकात जात होते. तेव्हा, दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी त्यांच्या हातातील सुटकेस हिसकावली. यावेळी मेहता यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ते काही अंतरावर फरफटत गेले. यात त्यांच्या हाताला मुका मार लागला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून अज्ञात चोरांचा पिंपरी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, भर दिवसा अशा प्रकारची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *