*मोशी येथील नियोजित जागी कोर्टाच्या इमारतीचे बांधकामासंदर्भात हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार-आमदार अण्णा बनसोडे

Spread the love

 

*वकिलांच्या समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन!*

महाराष्ट्र 24- पिंपरी-

पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. दिनकर बारणेंसह इतर वकिलांनी पिंपरी कोर्टाचे मोशी येथील नियोजित जागेत लवकरात लवकर कोर्टाचे इमारतीचे बांधकाम सुरू करणेबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणेबाबत आमदार आण्णा बनसोडे यांना विनंती केली होती. सदर कामी इमारतीचे बांधकामाचा प्रश्न लवकरात लवकर सोडविणेसाठी खर्चाचे रकमेची मान्यता मिळवून तरतूद करणेकामी आगामी हिवाळी अधिवेशनात प्रयत्न करू. तसेच वकिलांच्या समस्या लवकर सोडवु असे आश्वासन आमदार आण्णा बनसोडे यांनी दिले. पिंपरी विधानसभेचे कार्यक्षम आमदार आण्णा बनसोडे यांनी पिंपरी न्यायालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

असोसिएशनतर्फे आमदारांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. दिनकर बारणे, माजी अध्यक्ष ॲड. संजय दातिर पाटील, ॲड. सुशील मंचरकर, ॲड. अनिल तेजवानी, ॲड. सुनील कडूस्कर तसेच ॲड. सुजाता बिडकर, ॲड. पूनम राऊत, ॲड. जिजाबा काळभोर,ॲड. बाळासाहेब रणपिसे, ॲड. सागर अडागळे, ॲड. अनिल पवार, ॲड. राजेश रणपिसे,ॲड. बी.के. कांबळे,ॲड. सुनील माने,ॲड. विजय मैद, ॲड. अंकुश गोयल इत्यादी वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *