Whatsapp चॅट पूर्णपणे बदलणार! ‘मेटा’चा मेगा प्लॅन; तुम्हाला ‘हे’ Update दिसतंय का?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ ऑगस्ट ।। जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग प्लॅटफॉर्म कात टाकणार आहे. या नव्या फिचरमुळे तुम्ही यावरुन संवाद साधण्याची पद्धत पूर्णपणे बदलून जाणार आहे. या फिचरची सध्या चचणी सुरु असून बिटा व्हर्जनमध्ये हे फिचर दिसू लागलं आहे. जाणून घेऊयात नेमकं ही फिचर आहे तरी काय…

तुम्ही सुद्धा व्हॉट्सअप वापरत असाल तर तुमच्यासाठीही ही बातमी फार महत्त्वाची आहे कारण आता व्हॉट्सअपवरुन चॅट करण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. नेमकं काय होणार आहे पाहूयात…

व्हॉट्सअपच्या नव्या बिटा व्हर्जनमध्ये गुप्ततेसंदर्भात म्हणजेच युझर्स प्रायव्हसीमध्ये सर्वात मोठा बदल केला जाणार आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्पॅमिंग म्हणजेच खोट्या लिंक्सच्या माध्यमातून होणारी फसवणूक आणि तत्सम गोष्टी टाळण्यासाठी आता व्हॉट्सअपची पालक कंपनी असलेल्या मेटाकडून अत्यंत महत्त्वाच्या फिचरची चाचपणी सुरु असल्याचे समजते. हे फिचर आहे युझरनेम पीनचं!

व्हॉट्सअपच्या अँड्रॉइडसाठीच्या बिटा व्हर्जन 2.24.18.2 मध्ये युझरनेम पीन सेवेची चापणी केली जात आहे. युझर्सची सुरक्षा अधिक वाढवण्याच्या दृष्टीने तसेच नकोसे मेसेज टाळण्यासाठी ही नवीन यंत्रणा लागू केली जाईल असं जीएसएम अरेनाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

नव्या अपडेट्सनुसार व्हॉट्सअप युझर्सला त्यांचा चार आकडी पीन नंबर सेट करता येणार आहे. युझरनेमप्रमाणे हा पीन क्रमांक युझर्सच्या आवडीनुसार ठेवता येईल अशी मूभा दिली जाणार आहे.

युझरनेम पीनमुळे युझर्सला अधिक सुरक्षा मिळणार आहे. पूर्वी कधीही व्हॉट्सअपवरुन ज्या व्यक्तींशी संपर्क केला नाही अशा व्यक्तींना आता या पीन सुरक्षेमुळे थेट मेसेज पाठवता येणार नाहीत.

समोरच्या व्यक्तीकडे केवळ तुमचा फोन नंबर असेल तर त्याला थेट मेसेज तुम्हाला करता येणार नाहीत. यामुळे स्मॅमिंगची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि युझर्सला अधिक सुरक्षा मिळेल असा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *