प्लाझ्मा दान करणाऱ्याला ‘हे’ राज्य सरकार देणार ५ हजारांचे बक्षीस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढत होत आहे. पण त्यात दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनावर यशस्वीरित्या मात करणाऱ्यांची संख्या देखील चांगलीच आहे. त्यामुळे देशात सध्या प्लाझ्माची मागणीही वाढत आहे. प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.

या दरम्यान कोरोनामुक्त लोकांना प्लाझ्मा दान करण्याचे कर्नाटक सरकारने आवाहन केले आहे. त्याचबरोबर कर्नाटक सरकारने प्लाझ्मा दान केल्यानंतर त्याबदल्यात बक्षीसही देण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्लाझ्मा दान करुन एखाद्याचा जीव वाचवण्यासह, सरकारकडून 5000 रुपयांचे बक्षीसही देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *