Hyundai Alcazar: ह्युंदायने सुरू केली नवी अल्काझारची बुकिंग, टोकन देण्यासाठी द्यावे लागतील इतके पैसे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ ऑगस्ट ।। ह्युदांयने अल्काझारची झलक दाखवली आहे. ह्युदांय मोटर इंडियाने ही कार आपल्या अधिकृत वेहसाईटवरही डिस्प्ले केली आहे. ह्युदांयने नवी क्रेटा या वर्षाच्या सुरूवातीला मार्केटमध्ये सादर केली होती. ही नवी अल्काझार नव्या क्रेटवर आधारित मॉडेल आहे हे क्रेटाचे ३ रो व्हर्जन आहे.

कधी लाँच होणार नवी अल्काझार?
ह्युदांयची नवी अल्काझार ९ सप्टेंबरला लाँच होत आहे. ह्युदांयने अल्काझारला क्रेटापेक्षा वेगळा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. या नव्या कारचा पुढील आणि मागील भाग नव्या लूकसह स्टाईल करण्यात आला आहे. नव्या अल्काझारमध्ये revamped बंपर, हुड, स्किड प्लेट आणि ग्रिल लावण्यात आली आहे.

या गाडीच्या मागील भागामध्ये नवे बंपर आणि लॅम्प्स लावण्यात आले आहेत. या कारमध्ये १८ इंचाच्या अलॉय व्हील्सचा वापर करण्यात आला आहे. ह्युदांयने सांगितले की ही कार ६ सीटर आणि ७ सीटर या दोन्ही मॉडेलमध्ये मार्केटमध्ये येणार आहे.

नव्या अल्काझारची पॉवर
ह्युदांयच्या या मॉडेलच्या पावरबद्दल बोलायचे झाल्यास ही कार १.५ लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह येते. या इंजिनसह ६ स्पीड मॅन्युअल अथवा एक डीसीटी ट्रान्समिशन मिळू शकते. यासोबतच या कारमध्ये १.५ लीटर डिजेल पर्यायही मिळू शकतो. यासोबतच ाच टॉर्क कन्वर्टर आणि एक मॅन्युअल ट्रान्समिशन मिळू शकतो.

इतकी आहे बुकिंग रक्कम
नव्या ह्युदांय अल्काझारची बुकिंग सुरू झाली आहे. कंपनीने या कारच्या बुकिंगसाठी टोकन रक्कम २५ हजार रूपये ठेवली आहे. ही कार ९ रंगाच्या पर्यायसह भारतीय बाजारात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *