महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ ऑगस्ट ।। फास्टटॅग युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता फास्टटॅगचे पैसे संपल्यावर तुम्हाला रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डला ई- मॅडेंट फ्रेमवर्कमध्ये सहभागी केले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाअंतर्गत दोन्ही पेमेंट मोडमध्ये रिचार्ज संपला तरीही तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. टोल नाक्यावर तुमचा टोल आपोआप भरला जाईल. म्हणजेच फास्टटॅगमधील पैशांची लिमिट संपल्यावर ग्राहकांच्या खात्यातून पैसे डायरेक्ट फास्टटॅग अकाउंटमध्ये जमा होतील. यामुळे आता तुम्हाला सारखं रिचार्ज करण्याची गरज नाही.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे फास्टटॅग रिचार्ज करण्याचे काम कमी होणार आहे. तुमच्या अकाउंटमध्ये पुरेसे पैसे नसले तरीही टोल नाक्यावर तुम्हाला थांबावे लागणार नाही. तुमच्या फास्टटॅग अकाउंटमध्ये डायरेक्च पैसे ट्रान्सफर केले जातील.
आरबीआयने याबाबत माहिची दिली आहे. फास्टटॅग आणि NCMC अंतर्गत पेमेंट करण्याची कोणतीही मर्यादा नसते. कधीही तुम्हाला पेमेंट करण्याची गरज भासू शकते. अशा वेळी तुम्ही टोलवर वाहन थांबवून फास्टटॅग रिचार्ज करु शकत नाही. त्यामुळे तुमच्या खात्यातील पैशांची मर्यादा संपल्यास तुमच्या खात्यात आपोआप पैसे जमा होतील.
यासाठी युजर्संना प्री-डेबिट नोटिफिकेशची गरज भासणार आहे. याआधी फास्टटॅग अकाउंटमधील पैसे संपण्याआधीच २४ तास अगोदर प्री-डेबिट नोटिफिकेशन पाठवावे लागायचे. परंतु आता हे नोटिफिकेशन पाठवणे गरजेचे आहे. फास्टटॅग आणि NCMC चा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्त त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.