महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ ऑगस्ट ।। पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून याचा फटका विमानसेवेलाही बसला आहे. आज जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं कोसळलं आहे. हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे चारही जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आलेलं नाही. पौड जवळ कोढांवळे गावातीस गारवा हॅाटेलनजीक ही घटना घडली आहे.
मुळशी तालुक्यातील कोंढावळे येथे हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाडामुळे खाली पडल्यामुळे चार जण जखमी झाले आहेत. ग्लोबल हेक्ट्रा या कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. मुंबईहून उड्डाण घेतलेले हे हेलिकॉप्टर हैदराबादच्या दिशेने जात होतं. पायलट जखमी असून नजीकच्या रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे. कॅप्टन आनंद असं पायलटचं नावं आहे. दिर भाटिया, अमरदिप सिंग, एस पी राम अशी हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांची नावं आहेत.