महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑगस्ट ।। सप्टेंबर महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकांमधील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. RBI च्या हॉलिडे कॅलेंडर 2024 नुसार, भारतातील विविध क्षेत्रांमधील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका सप्टेंबरमध्ये एकूण 15 दिवस बंद राहतील. जर तुमच्याकडे बँकेशी संबंधित काम असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून बँक बंद असताना तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. सप्टेंबरमधील 15 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्या तसेच रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश होतो.
सप्टेंबर महिना हा सणासुदीचा महिना असल्याने या महिन्यात सुट्यांचा पाऊसच असणार आहे. या महिन्यात गणरायांचे आगमनही होणार आहे त्यामुळे अधिकाधिक सुट्या बँकांला असणार आहे.
सप्टेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी
१ सप्टेंबर : रविवारची सुट्टी
४ सप्टेंबर: श्रीमंत शंकरदेवाची तिरुभव तिथीची सुट्टी (गुवाहाटी)
७ सप्टेंबर: गणेश चतुर्थी (जवळजवळ संपूर्ण भारतातील बँकांना सुट्टी असणार
८ सप्टेंबर : रविवारची सुट्टी
१४ सप्टेंबर: दुसरा शनिवारची सुट्टी, पहिला ओणम (कोची, रांची आणि तिरुवनंतपुरम)
१५ सप्टेंबर: रविवारची सूट्टी
१६ सप्टेंबर: बारावाफट (जवळजवळ संपूर्ण भारतातील बँकांना सुट्टी असणार)
१७ सप्टेंबर: मिलाद-उन-नबीची सुट्टी (गंगटोक आणि रायपूर)
१८ सप्टेंबर: पंग-लाहबसोलची सुट्टी (गंगटोक)
२० सप्टेंबर: ईद-ए-मिलाद-उल-नबीची सुट्टी (जम्मू आणि श्रीनगर)
२२ सप्टेंबर: रविवारची सुट्टी
२१ सप्टेंबर: श्री नारायण गुरु समाधी दिवसची सुट्टी (कोची आणि तिरुवनंतपुरम)
२३ सप्टेंबर: महाराजा हरिसिंह यांचा जन्मदिनची सुट्टी (जम्मू आणि श्रीनगर)
२८ सप्टेंबर : चौथा शनिवारची सुट्टी
बँकांमध्ये सततच्या सुट्ट्यांमुळे ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे, मात्र बँकेच्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही एटीएमचा वापर रोख रक्कम काढण्यासाठी करू शकता. डिजिटललायझेशनमुळे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही UPI, नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग वापरू शकता.