कोरोनाः पुण्यातील डॉक्टरांनो 15 दिवसांची सक्तीची ड्युटी करा …

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – ता. १८ – पुण्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुण्यातील सर्व डॉक्टरांना कोव्हिड-19 ड्यूटी बंधनकारक करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व रजिस्टर डॉक्टरांना कमीतकमी 15 दिवसांची कोरोना ड्यूटी सक्तीची करण्याचे आदेश दिले आहेत याबाबत एका वृत्तवाहीनीशी बोलताना पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, “पुणे जिल्ह्यातील सर्व रजिस्टर डॉक्टरांना 15 दिवस कोव्हिड-19 नियंत्रणासाठी ड्यूटी करावी लागेल.

तीन दिवसांच्या आत डॉक्टरांना जिल्हा अधिकाऱ्यांकडे ड्यूटी करण्याबाबत त्यांची इच्छा आणि कोणत्या भागात ड्यूटी करायची याची माहिती द्यावी लागेल.””जे डॉक्टर या आदेशाचं उल्लंघन करतील त्यांच्यावर एपिडेमिक कायद्यांतर्गत कारवाई करावी लागेल,” असं जिल्हाधिकारी नवल किशोर राम पुढे म्हणाले.पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. 4 जुलैपर्यंत पुणे शहरात कोव्हिड-19च्या 30,751 केसेस आहेत, तर 907 लोकांचा मृत्यू झालाय.पुणे ग्रामीणमध्ये 3985 केसेस आहेत आणि 113 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 7356 केसेस आहेत आणि 132 मृत्यू झालेत.

पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाबाबत बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणतात, “पुण्यात कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांना खासगी डॉक्टरांनी सेवा द्यावी असा आदेश दिलाय.

या आदेशाचं सर्व डॉक्टर पालन करतील. पण, फक्त डॉक्टर असून काहीच फायदा नाही. रुग्णालयातील बेड्सची संख्या वाढवली पाहिजे. कोव्हिड-19 सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा असणंही गरजेचं आहे.”

“मे महिन्यातच पुणे शहरात येत्या काही काळात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र प्रशासनाकडून वेळीच योग्य उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.

येत्या महिनाभरात पुण्यातील सर्व रुग्णालयातील बेडस कोरोनाग्रस्तांनी पूर्ण भरतील. त्यानंतर काय करणार? यावर प्रशासनाने विचार करून मुंबईच्या धर्तीवर मोठी रुग्णालयं उभारली पाहिजेत,” असं डॉ भोंडवे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *