MP School Video: मुख्याध्यापिकेची विद्यार्थ्यासोबत जोरदार हाणामारी, 2.15 सेकंदात काय काय घडलं?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑगस्ट ।। ग्वाल्हेरच्या खाजगी शाळेच्या मुख्याध्यापक आणि अकरावीच्या विद्यार्थ्यामध्ये झालेल्या हाणामारीचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहे.हे प्रकरण मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर जिल्ह्यातील हाजिरा भागातील असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांच मिल परिसरातील सीबीएस शाळेत ही घटना घडली.

ध्रुव आर्य हा इयत्ता 11वीत नापास झाल्यानंतर त्याचे ट्रान्सफर सर्टिफिकेट (TC) घेण्यासाठी शाळेत गेला होता. मात्र, ध्रुव आणि मुख्याध्यापिका निशा सेंगर यांच्यात फी न भरण्यावरून वाद झाला. ध्रुवने दावा केला त्याने सर्व बाकी राहिलेली फी भरली आहे, तर मुख्याध्यापिका म्हणाल्या की, फी न भरल्यामुळे विद्यार्थ्याला टीसी देणार नाही.

मुख्याध्यापिकेने फी भरल्याशिवाय टीसी देणार नाही म्हटल्यावर विद्यार्थी आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. त्यानंतर मुख्याध्यापिका निशा सेंगर यांनी ध्रुवला मारहाण केली. यानंतर उपप्राचार्य राकेश सिंह आणि रजनी नावाच्या आणखी एका शिक्षिकेनेही विद्यार्थ्याला मारहाण सुरू केली.

यानंतर विद्यार्थ्याने स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात मुख्याध्यापकांना ढकलून दिले. पुढे त्याने मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापिकेच्या कानशीलातही लगावल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले.

या मारहाणीत विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर, मानेला आणि डोक्याला जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान मुख्याध्यापिकेला कोणतीही दुखापत झाली नाही. याप्रकरणी दोन्ही पक्षांनी हजीरा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि शिक्षकाविरुद्ध गुन्हा
पोलिसांनी मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापकआणि शिक्षिकेविरुद्ध एससी/एसटी प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, ध्रुववर धमकी आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. मात्र, ध्रुवने फी भरली होती की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *