6 चेंडू.. 6 विकेट,विकेटने गाजले क्रिकेटचे मैदान; हा महान विक्रम करणाऱ्या गोलंदाजांनाबद्दल जाणून घ्या…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ ऑगस्ट ।। कोणत्याही गोलंदाजासाठी, एका षटकात 3 बळी घेणे हे कोणत्याही फलंदाजाने खेळलेल्या मोठ्या खेळापेक्षा कमी नाही. मात्र, ही कामगिरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाजांनी केली आहे. पण आपण अशा विक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत जो चमत्कारापेक्षा कमी नाही. अशेही काही गोलंदाज आहे ज्यांनी अविश्वसनीय पराक्रम केला आहे. क्रिकेटच्या जगतात 4 गोलंदाज असे आहेत ज्यांनी एकाच षटकात 6 बळी घेण्याचा चमत्कार केला आहे. मात्र, हा पराक्रम अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झालेला नाही. जाणून घेऊया त्या गोलंदाजांबद्दल

हर्षित सेठ: हर्षित सेठने अंडर-19 कारवान ग्लोबल टी-20 लीगमध्ये पाकिस्तानच्या हैदराबाद हॉक्सविरुद्ध हा पराक्रम करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली. भारतीय वंशाच्या या खेळाडूने 6 चेंडूत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

ॲलेड केरी: क्रिकेटमध्ये एकाच षटकात दुहेरी हॅट्ट्रिक घेणारा ऑस्ट्रेलियाचा ॲलेड केरी हा जगातील पहिला गोलंदाज होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोल्डन माईन क्लबकडून खेळताना त्याने एकाच षटकात अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. त्याच्या या विक्रमामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती.

लक्ष्मण : लक्ष्मण नावाच्या भारतीय खेळाडूनेही ही कामगिरी केली होती. मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याने हा विक्रम नोंदवला. त्याने पहिलेच षटक टाकत एकामागून एक 6 फलंदाज बाद करून मैदानात कहर निर्माण केला.

वीरनदीप सिंग : मलेशियाचा युवा फलंदाज वीरनदीप सिंगनेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये हा पराक्रम केला होता. नेपाळ प्रो क्लब चॅम्पियनशिप स्पर्धेत वीरनदीपने ही कामगिरी केली होती, पण त्याची एक विकेट रनआऊट झाली. त्याने 4 चेंडूत 4 बळी घेतले होते, त्यानंतर 5व्या चेंडूवर धावबाद होत असताना फलंदाजाने आपली विकेट गमावली.

असा पराक्रम अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तरी घडला नाही. परंतु तो दिवस लांब नाही जेव्हा असा काही पराक्रम घडेल कारण दिवसेंदिवस क्रिकेटने वेग पकडला आहे. आता तर कसोटी क्रिकेटला ही कुठेतरी वन डे आणि T20 सारखाच होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *