महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ ऑगस्ट ।। शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्यभरात सरकारची प्रतिमा मलिन होत असून केवळ कारवाईच्या घोषणा नको, तर कृती करा, शाळांमध्ये मुलींच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना करा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना समज दिल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) माध्यमातून महायुती सरकारची राज्यभर चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना बदलापुरमधील एका शाळेत (Badlapur Crime) अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण राज्यात सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहचला आहे. त्यामुळे रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण विभागाच्या कारभारावरुन मंत्रिमंडळाने तीव्र नाराजी देखील व्यक्त केल्याचे समजते.