पुण्यात फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची हत्या; धारदार शस्त्रांनी वार करून संपवलं!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ सप्टेंबर ।। हडपसर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर मध्यरात्री फायनान्स कंपनीचे मॅनेजर वासुदेव कुलकर्णी यांचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र खुनाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, वासुदेव कुलकर्णी हे पुण्यातील एका प्रतिष्ठित फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. रविवारी रात्री वासुदेव कुलकर्णी हे त्यांच्या घरासमोर शतपावली करत असताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . हल्लेखोर हल्ला करुन घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, परंतु पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान, पुणे शहरात १२ तासांतच दोन खुनांच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *