महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ सप्टेंबर ।। सध्या सर्वकाही डिजिटल झाले आहे. त्यामुळे आपण कोणतेही व्यव्हार करताना डिजिटल पेमेंटचा वापर करतो. डिजिटल पेमेंटमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्यातच आता तुम्ही एटीएममध्येही पैसे जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी UPI चा वापर करु शकतात. यूपीआयचा वापर करुन आता एटीएममधून पैसे काढणे सोपे होणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी नवी सर्व्हिस सुरु केली आहेत. या सर्व्हिसमध्ये ग्राहक एटीएममध्ये कॅश जमा करु शकणार आहेत. ग्राहकांना एटीएममधून कॅश काढणे किंवा जमा करणे सोपे व्हावे यासाठी ही सर्व्हिस सुरु केली आहे.डेबिट कार्डशिवाय पैसे जमा करण्याच्या प्रोसेसला UPI इनऑपरेटेबल कॅश डिपॉझिट असे म्हणतात. हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डेव्हलप केले आहे.
एटीएममध्ये UPI च्या माध्यमातून पैसे कसे जमा करायचे?
एटीएममध्ये पैसे जमा करण्याआधी सर्वप्रथम तुमच्या घराजवळच्या एटीमएम मशीनमध्ये रिसायक्लिंग मशीन आहे की नाही हे चेक करा. त्याचसोबत एटीएम UPI-ICD ला सपोर्ट करणारे असायला हवे.
सर्वप्रथम एटीएमच्या स्क्रिनवरील कॅश जमा करण्याच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर UPI आयडीला जोडलेला मोबाईल नंबर किंवा IFSC कोड टाका. त्यानंतर पैसे स्लॉटमध्ये ठेवा. हे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील.
UPI च्या माध्यमातून एटीएममधून पैसे कसे काढायचे?
तुमचा UPI नंबर रजिस्टर असेल तरच तुम्ही UPI-ATMचा वापर करु शकतात.
एटीएममध्ये जाऊन तुम्ही UPI Cash Withdrwl/Cardless Cash किंवा QR Cash च्या ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर एटीएम मशीनमध्ये तुम्हाला जेवढे पैसे काढायचे आहेत ती अमाउंट टाकावी लागेल.
यानंतर तुम्हाला एटीएम मशीनवर डायनामिक क्यूआर कोड दिसेल. त्यानंतर तुम्ही यूपीआय अॅपचा वापर करुन स्कॅन करु शकतात. यानंतर तुम्ही UPI पिन टाकून पैसे काढू शकतात.