Rickshaw Ban: भारतातील एक असं शहर जिथे रिक्षा चालवण्यास परवानगी नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ सप्टेंबर ।। रेल्वे आणि बस यांसह आपल्या शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी व्यक्ती रिक्षाचा वापर करतात. भारतात प्रत्येक राज्यात रिक्षा चालवली जाते. रिक्षामुळे आपण कमी वेळात आपल्याला हवे त्या ठिकाणी पोहचू शकतो. मात्र तुम्हाला माहितीये का भारतातील एक असं शहर आहे जिथे रिक्षा चालविण्यास परवानगी नाही. ते शहर कोणतं त्याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत. तसेच याचे कारण काय हे सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत.

मुंबईची लाईफस्टाईल सर्वांनाच हवीहवीशी वाटते. येथे अनेक सामान्य नागरिक वास्तव्यास आहेत. मुंबईत फिरताना तुम्हाला जाणवेल की, येथे अनेक छोट्या छोट्या गल्ल्या आणि एकीकडे मोठ-मोठे टॉवर बांधण्यात आले आहेत.

ब्रिटिशांच्या काळातील बांधकाम
तुम्ही दक्षिण मुंबईत फिरत असाल तर येथे तुम्हाला अनेक बांधकाम ब्रिटिशांच्या काळातील असल्याचे समजेल. येथे अनेक दगडी इमारती आहेत आणि भक्कम रत्यांचे बांधकाम आहे.

दक्षिण मुंबईतील शहरे
कुलाबा, चर्चगेट, परळ, फोर्ट, दादर, गिरगाव, वाळकेश्र्वर आणि मलबार हिल्स अशी दक्षिण मुंबईतील काही शाहरे आहेत. येथे लाखोंच्या संख्येत सामान्य म्हणजेच मिडलक्लास फॅमिली राहतात. त्यांना रिक्षाची गरज आहे. मात्र तरीही सरकारने या दक्षिण मुंबईत रिक्षाला बंदी घातली आहे.

दक्षिण मुंबईत रिक्षाला बंदी का?
अरुंद रस्ते

दक्षिण मुंबईत ब्रिटिशांच्या काळात अनेक बांधकामे करण्यात आली आहेत. त्याकाळी येथे अगदी अरुंद रस्ते बांधण्यात आलेत. अरुंद रस्ते येथे रिक्षा बंद करण्याचे पाहिले कारण आहे.

ट्रॅफिकची समस्या
रस्ते अरुंद असल्याने येथे तीन चाकी रिक्षा अडकण्याची भीती आहे. तसेच येथील काही रस्त्यांना एकच टर्न आहे. ट्रॅफिकचे भरमसाठ नियम पाळणे रिक्षाला कठीण आहे. हे देखील येथे रिक्षाला परवानगी नसल्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणावं लागेल.

फ्लायओवर नाही
मुंबईत तुम्ही अन्य भागात पाहिलं तर येथे रस्त्यासह अनेक ठिकाणी फ्लायओवर बांधण्यात आले आहे. त्यामुळे ट्रॅफिक जास्त झालं तरी ते सोडवणे शक्य आहे. मात्र दक्षिण मुंबईत फ्लायओवर नसल्याने येथे रिक्षामुळे ट्रॅफिक जास्त वाढण्याची भीती आहे.

हाय प्रोफाईल मेंटलिटी
दक्षिण मुंबईमध्ये गरीब, मध्यम वर्गीय आणि श्रीमंत व्यक्ती आहेत. येथे जास्त प्रमाणात हाय प्रोफाईल व्यक्ती राहतात. येथील व्यक्तींचे असे म्हणणे आहे की वरळी ते कुलाबा येथे रिक्षा शोभून दिसत नाही.

स्टेटस मेन्टेन ठेवणे
येथील हाय प्रोफाईल लोकांचं असं म्हणण आहे की, मुंबईमध्ये रस्त्यावर तुम्हाला अनेक स्पोर्ट्स बाईक आणि महागड्या कार धावताना दिसतात. या रस्त्यावर त्यांच्या शेजारी टॅक्सी शोभते. मात्र आपली तीन चकी खरखर करणारी रिक्षा येथे शोभत नाही. स्टेटस मेन्टेन ठेव्यसाठी येथे रिक्षा नको असं या व्यक्तीचं म्हणणं आहे.

इतिहास काय सांगतो
1910 नंतरच्या काळात मुंबईमध्ये सार्वजनिक वापरासाठी वाहनांना परवानगी देण्यात आली. तेव्हापासून येथे टॅक्सी चालते. त्यामुळे टॅक्सी चालकांनी येथे आपला जम बसवला आहे. CSMT शहर तर टॅक्सीचे हब म्हणून ओळखलं जातं. एकंदर या सर्व बाबी लक्षात घेता सरकारने दक्षिण मुंबईत आपल्या सध्या रिक्षाला बंदी आणली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *