महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – नागरिकांना फक्त एका क्लिकवर लुटण्यासाठी सायबर भामटय़ांनी आता नवीन मालवेअर तयार केले आहे. ते मालवेअर चुकूनही मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यास संबंधित व्यक्तीच्या मोबाईलमधील सर्व माहिती तसेच काय टाइप केले जाते ते सर्व सायबर भामटय़ांना समजू शकणार आहे. ऍण्ड्रॉईड मोबाईल वापरणाऱयांना या मालवेअरचा सर्वाधिक धोक असून सायबर पोलिसांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
सायबर भामटय़ांनी ऍण्ड्रॉईड मालवेअर तयार केले आहे. हे मालवेअर ऍण्ड्रॉईड मोबाईल फोन वापरणाऱयांना जास्त धोकादायक आहे. हे मालवेअर फोनमध्ये इन्स्टॉल झाल्यास फोनमधील सर्व माहिती तसेच मोबाईलवर काय शब्द टाईप केले जातात हे देखील सायबर भामटय़ांना समजू शकणार आहे. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी फक्त अधिकृत आणि शक्यतो गुगल प्ले स्टोअर्समधून कोणतेही मोबाईल ऍप डाऊनलोड करावे. तसेच कुठल्याही मोबाईल बँकिंग ऍपमध्ये ऑटोलॉगिंनचा पर्याय वापरू नये असे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
