भोसरी महावितरण मनुष्यबळ भरतीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती!

Spread the love

Loading

आमदार महेश लांडगे यांनी विधानसभा अधिवेशनामध्ये राज्य सरकारचे वेधले होते लक्ष

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन- दि.5 – भोसरी विधानसभा मतदार संघातील महावितरण भोसरी विभागासाठी निर्मिती केलेल्या पदांची भरती व कायमस्वरुपी अधिकारी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे महावितरणचे मनुष्यबळ भरतीला गती मिळणार आहे.

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी विधानसभा अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी राज्याचे उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण भोसरी विभागांतर्गत एक नवीन उपविभाग व तीन नवीन शाखा कार्यालय यांना मंजुरी देण्याची घोषणा केली होती.

दरम्यान, राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, एक अतिरिक्त कार्यकारी अभियंता, तीन सहाय्यक अभियंता, एक सहाय्यक लेखापाल तसेच इतर अधिकारी आणि ५८ तांत्रिक कर्मचारी अशा पदांची निर्मिती केली आहे. सध्या ५१ तांत्रिक कर्मचारी पैकी काही तांत्रिक कर्मचाऱ्यांची नेमणूक झालेली आहे व इतर बाह्य स्त्रोत कर्मचारी यांच्यामार्फत काम करण्यात येत आहे.

सदर उपविभाग व शाखा कार्यालय यांचे संचालन होण्यासाठी कार्यालय प्रमुख असलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक होणे गरजेचे आहे ती झालेली आहे. भोसरी- २ उपविभाग येथे कार्यालय प्रमुख असलेल्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदावर अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी पदस्थापना झालेली आहे. तसेच तीनही नवीन शाखा कार्यालयातील सहाय्यक अभियंता हे पदसुद्धा कायमस्वरूपी भरण्यात आलेले आहे. त्यामुळे महवितरण शाखा विस्तार आणि सेवा सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या स्थापनेपासून महावितरण वीज पुरवठा यंत्रणा व इन्फ्रास्ट्रक्चर कालानुरुप सक्षम करण्याची गरज आहे. कारण, वीज ग्राहकांच्या बाबतीत विचार केला असता २०२४ मध्ये संख्या २ लाख २५ हजार ६९८ इतकी वीज ग्राहकांची संख्या आहे. त्यामुळे आम्ही महावितरण इन्फ्रा- १ ची कामे पूर्ण झाली आहेत. आता इन्फ्रा- २ मधील कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. या करिता सातत्त्यपूर्ण पाठपुरावा करीत आहोत. मनुष्यबळ निर्मितीमुळे नवीन उपकेंद्र, रोहीत्र आणि संबंधित कामे करणे सुलभ होणार आहे. महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *